नवी दिल्ली : मोबाईल नंबर, बॅंक अकाऊंटसोबत आधार नंबर लिंक करण्यासोबतच नागरिकांमध्ये आणखी एका गोष्टीची धास्ती परसली आहे. ती म्हणजे प्रॉपर्टीच्या देवाण-घेवाणीसाठी आधार कार्ड लिंक करणे.
गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत अनेक चर्चा होत आहेत. पण सरकारने एक याबाबतीत एक महत्वपूर्ण माहिती समोर जारी केली आहे.
प्रॉपर्टीची देवाण-घेवाण आधार कार्डला जोडणे बंधनकारक करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. केंद्र सरकारकडून संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना हे सांगितले आहे. मंगळवारी शहरी विकास राज्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लोकसभेत लिखित उत्तरात सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना असे सांगण्यात आले आहे की, असा कोणताही प्रस्ताव नाहीये.
काही महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास मंत्रालयाने असा सल्ला दिला होता की, १९०८ च्या रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार संपत्तीच्या खरेदीला आधारसोबत जोडलं गेलं पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांच्या या उत्तराला महत्वपूर्ण मानलं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी सरकारनेच म्हटले होते की, आधार कार्ड बँक खात्यांसोबत जोडणे बंधनकारक करण्यासोबतच प्रॉपर्टी मार्केटमध्ये लागू केलं जाऊ शकतं.
या मुद्द्यावरील प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, ‘सध्याच प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शनला आधार कार्डसोबत जोडणे बंधनकारक करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये’.