शुक्रवारी होणार नोबेल शांती पुरस्कारांची घोषणा

आजपासून आठ तारखेपर्यंत रोज विविध क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर होणार आहेत.

Updated: Oct 1, 2018, 08:21 AM IST
शुक्रवारी होणार नोबेल शांती पुरस्कारांची घोषणा  title=

नवी दिल्ली : येत्या शुक्रवारीच्या  नोबेल शांती पुरस्काराची घोषणा होणार आहे. यंदा जगातल्या सर्वात महत्वाच्या या पुरस्कारारासाठी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेल मर्कल यांचं नाव शांतीपुरस्कारासाठी सर्वात आघाडीवर आहे. देशांतर्गत राजकीय विरोध न जुमानता मर्कल यांनी २०१५मध्ये उत्तर आफ्रिका, प्रमुख्यानं सीरियातून येणाऱ्या शरणार्थींना जर्मनीत आश्रय दिला.

रोज पारितोषिक जाहीर 

मर्कल यांच्या याच निर्णयामुळे युरोपातील इतर देशांनाही शरणार्थींना आश्रय देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या याच निर्णय क्षमतेसाठी मर्कल यांना शांती पुरस्कारारासाठी नामंकित करण्यात आलंय. दरम्यान आजपासून आठ तारखेपर्यंत रोज विविध क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर होणार आहेत.