अचानक न्यूड व्हिडीओ कॉल येण्याचं प्रमाण वाढलं; सेक्सटॉर्शन अन् बदनामीच्या भीतीने तरुणांच्या आत्महत्या...

देशातील हे शहर सेक्सटॉर्शनचे मोठे केंद्र बनत चालले आहे. बदनामीच्या भीतीने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. 

Updated: Apr 3, 2022, 12:09 PM IST
अचानक न्यूड व्हिडीओ कॉल येण्याचं प्रमाण वाढलं; सेक्सटॉर्शन अन् बदनामीच्या भीतीने तरुणांच्या आत्महत्या... title=

भोपाल : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदौरचा देशभरात लौकीक आहे. परंतू हे शहर सध्या सेक्टॉर्शनमुळे चर्चेत आलं आहे. मिनी मुंबई म्हणून ओळखले जाणारे इंदौर आता सेक्सटॉर्शनचे मोठे ठिकाण बनत आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, इंदूरमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे आक्षेपार्ह कृत्ये करून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत. या वर्षाचे बोलायचे झाले तर जे आकडे समोर आले आहेत ते धक्कादायक आहेत.

अवघ्या 3 महिन्यांत 100 प्रकरणे

या वर्षात पहिल्या 90 दिवसांत अशा 100 हून अधिक सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण त्याचा बळी ठरत आहेत. तर दुसरीकडे अनेक नावाजलेले लोकही त्यांचे बळी ठरले आहेत. मात्र बदनामीच्या भीतीने ते पुढे येत नाहीत.

अनेकांनी केल्या आत्महत्या

अनेक लोक आहेत ज्यांनी या लोकांच्या जाळ्यात अडकून बदनामीच्या भीतीने आपला जीव दिला. अशा परिस्थितीत या आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने देशाच्या विविध भागात पथके पाठवली आहेत. ज्यामध्ये दिल्ली एनसीआर नोएडा आणि राजस्थानचे भरतपूर मथुरा आग्रा ग्वाल्हेर सारख्या भागांचा समावेश आहे.

सेक्सटॉर्शनचे म्हणजे काय

आजकाल सायबर ठग लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटोर्शनद्वारे लोकांकडून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शनचे  म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे. आता भारतातही त्याची प्रकरणे वाढत आहेत. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात.

या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा

  • - पॉर्न साइट्स सर्फ करू नका
  • - फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा
  • - ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक असेल त्यांना भेट द्या
  • - लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा
  • - फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा
  • - कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा
  • - अनोळखी लोकांशी संबंध ठेवताना काळजी घ्या