Omicron : सरकारची उडाली झोप, परदेशातून आलेले इतके लोक बेपत्ता

Omicron Alert India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

Updated: Dec 11, 2021, 06:28 PM IST
Omicron : सरकारची उडाली झोप, परदेशातून आलेले इतके लोक बेपत्ता title=

लखनौ : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट Omicron ची दहशत वाढतेय. भारतात आतापर्यंत 33 बाधित रुग्ण आढळले आहेत. जगभरात पसरलेल्या या धोक्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Third Wave) चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग थांबवण्यासाठी केंद्र सरकारपासून ते सर्व राज्य सरकारे देखील प्रयत्नशील आहेत.

उत्तर प्रदेश सरकारची मात्र झोप उडाली आहे. शुक्रवारी आयडीएसपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 46 लोक परदेशातून राज्यात परतले आहेत. जिल्हा आयडीएसपी प्रभारी डॉ. अनुराग गौतम यांनी सांगितले की, 46 जणांपैकी 29 जणांचा शोध लागला आहे. ज्यामध्ये उच्च जोखमीच्या देशांमधून परतल्यानंतर 11 लोकं बेपत्ता आहेत. म्हणजेच प्रशासनाला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाहीये.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही परदेशातून परतलेल्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली नाही, ज्यामुळे असे अनेक लोक कोरोना वाहक बनले.

बेपत्ता असलेल्या व्यक्तींसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे, मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत. त्याचवेळी तीन जणांचा शोध लागला असला तरी ते दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

आयडीएसपी प्रभारींच्या म्हणण्यानुसार, परदेशातून परतलेल्या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणीशी संबंधित कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. त्याच वेळी, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, आठ दिवसांनंतर, प्रत्येकाची कोरोना चाचणी पुन्हा केली जाईल.