तुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा

जर तुम्ही ऑनलाईन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. दिल्लीतील एका महिलेच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये चोरी गेले आहेत. हॅकर्सच्या नव्या ट्रिकने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही पण या प्रकरणाबद्दल जाणून घ्या आणि काळजी घ्या...

Updated: Jun 30, 2022, 08:48 PM IST
तुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा title=

दिल्ली : जर तुम्ही ऑनलाइन जॉब सर्च करत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. नुकतीच एक अशी घटना समोर आली ज्यामुळे अनेकांचा पाया खालची जमीन सरकलीय.दिल्लीतील एका महिलेची ५० लाखांची फसवणूक करण्यात आली. नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेकडून चार लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना घडली. फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेला एसएमएसद्वारे URL पाठवली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले आणि अशी ही महिला हॅकर्सच्या जाळ्यात अडकली.

सावधान.. तुम्ही लिंकवर क्लिक करताच पैसे उडतील

लिंकवर क्लिक केल्यावर, महिलेला समजलं की तिचं डिव्हाइस हॅक झालं आहे. खात्यातून अचानक 4 लाख रुपये काढण्यात आलेत. चांगली गोष्ट म्हणजे महिलेने या घटनेची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी दिल्लीतील शकरपूर आणि नोएडा येथून दोघांना अटक केली असली तरी इतर चार आरोपी फरार आहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, महिलेला एका ई-कॉमर्स कंपनीत नोकरीची ऑफर देण्यात आली आणि एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं होत.

हॅकर्सची नवीन ट्रिक

एफआयआरनुसार, महिलेने लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या खात्यातून पैसे काढले. हे हॅकर्स या नोकरी शोधणार्‍यांना अशा प्रकारे लिंक पाठवून त्यांना खोटे आश्वासन देऊन पैसे उकळतात. या प्रकरणात, हॅकर्सनी नोकरीची संधी असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला आणि तिला एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले.

मोबाईलवर आलेला ओटीपी पाहा..

हा फिशिंग घोटाळा असू शकतो. कारण, एकदा क्लिक केल्यानंतर, मालवेअर तुम्हाला वेबसाइटवर घेऊन जातो आणि तुमचा डेटा चोरला जातो आणि हॅकर्सना माहिती पाठवतो. हा देखील असाच एक भयानक ऑनलाइन घोटाळा आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

डीसीपी ईशा पांडे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, 'आरोपींनी चौकशीदरम्यान मान्य केलय की ते लिंक तयार करतात आणि लोकांना नोकरीचे आश्वासन देऊन पाठवतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होतो आणि पैसे ट्रान्सफर करताना मोबाईलवर येणारा ओटीपी हॅकर्सना सहज दिसतो.