Optical Illusion: बेडरुममध्ये लपून बसलाय बेडूक; फक्त 7 सकेंदमध्ये शोधून दाखण्याचे चॅलेंज

या Optical Illusion अर्थात दृश्यमान चित्रात मुलीची बेडरूम दिसत आहे. या बेडरूममध्ये कुठेतरी बेडूक दडलेला आहे. हाच बेडूक तुम्हाला शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाच वेळ दिला जाणार आहे. 

Updated: Jan 17, 2023, 09:33 PM IST
Optical Illusion: बेडरुममध्ये लपून बसलाय बेडूक; फक्त 7 सकेंदमध्ये शोधून दाखण्याचे चॅलेंज title=

Optical Illusion: हल्ली सोशल मीडियावर Optical Illusion क्वीजची चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. डोकं चक्रवणारी आणि नजरेला धोका देणारी अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर तुफना व्हायरल होत आहेत. नेटकरी तितक्याच उत्साहाने हे Optical Illusion ने क्वीज सोडवतात. अशीच एक Optical Illusion असलेली इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बेडरुममध्ये एक बेडूक लपलेला आहे. अवघ्या  7 सकेंदमध्ये फोटोतील बेडूक शोधून दाखण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे. 

या Optical Illusion अर्थात दृश्यमान चित्रात मुलीची बेडरूम दिसत आहे. या बेडरूममध्ये कुठेतरी बेडूक दडलेला आहे. हाच बेडूक तुम्हाला शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाच वेळ दिला जाणार आहे. 

या चित्रामध्ये एक मुलगी तिच्या बेडवर टेडी बेअर घेऊन झोपलेली आहे. तिने बाहुलीला कुशीत घेतले आहे.  एक पुस्तक जमिनीवर पडलेले आहे. बेडरुमच्या खिडकीजवळ एक टेबल आहे. या टेबलवर एक बास्केट आहे. या बास्केटमध्ये 
ससा, कार, चेंडू, तसेच एक ठोकळा अशी काही खेळणी ठेवली आहे. खिडकीतून चंद्र आणि तारे देखील दिसत आहेत.

मुलगी ज्या बेडवर झोपली आहे. त्या बेडच्या मागच्या भिंतीवर दोन पेंटींग्ज टांगलेल्या आहेत. एका पेंटींगमध्ये उडणारे रॉकेट आहे. तर, दुसऱ्या पेंटींग हे निसर्ग चित्राचे आहे. या पेंटींगमध्ये डोंगर आणि झाड दिसत आहे.  फक्त 3 टक्के लोकांनी या चित्रात लपलेला बेडूक फक्त 7 सेकदांमध्ये शोधला आहे. हे ऑप्टिकल भ्रम चित्र तुमचा IQ तपासण्याचा एक मजेदार मार्ग आहे. अशा IQ चाचण्यांच्या माध्यमातून तुमची IQ पातळी जाणून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे.

बेडूक आहे कुठे?

बेडच्या मागच्या भिंतीवर दोन पेंटींग्ज टांगलेल्या आहेत. एका पेंटींगमध्ये उडणारे रॉकेट आहे. तर, दुसऱ्या पेंटींग हे निसर्ग चित्राचे आहे. या निसर्ग चित्रामध्येच बेडूक लपलेला आहे. डोंगर आणि झाड दिसत आहे. य झाडामध्येच बेडूक लपला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x