Optical Illusion : भले भले पाहून गोंधळले! फोटो स्थिर आहे की अस्थिर? तुमच्याही डोळ्यांची फसवणूक होतेय?

Optical Illusion असलेले फोटो एक वेगळं आव्हान असतं.

Updated: Jun 17, 2022, 11:55 AM IST
Optical Illusion : भले भले पाहून गोंधळले! फोटो स्थिर आहे की अस्थिर? तुमच्याही डोळ्यांची फसवणूक होतेय? title=

मुंबई : फोटो काय करू शकत नाहीत? एखादा बसून वेळ घालवण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. अनेक फोटो तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात खोल रहस्यं प्रकट करू शकतात आणि कधीकधी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा दावा देखील करतात. फक्त हे फोटो अवघड आणि Optical Illusion असावीत, सामान्य नसावी. मग त्याचं कोडं सोडवण्यात आपण गुंतले जातो.

Optical Illusion असलेले फोटो एक वेगळं आव्हान असतं. कधी ते मेंदूला चालना देण्याचं काम करतात तर कधी ते डोळ्यांना अशा प्रकारे फसवतात की, नेमकं काय आहे ते समजत नाही. अशाच एका स्थिर फोटोने मन हेलावून टाकलं. या स्थिर फोटोकडे पाहिल्यानंतर ते हलत असल्याचं जाणवतं. 

कधी पाहिलाय असा फोटो?

अनेक रंगीत चौरसांचा समूह असलेला हा फोटो आहे. काही हलके तर काही गडद हिरव्या रंगाचे चौकोन असलेल्या या फोटोकडे पाहिल्यार ते हलताना दिसतात. जर वर आणि खाली स्क्रोल करून पाहिलं तर याची हालचाल वेगाने होताना जाणवते. 

हा फोटो तयार करणाऱ्या निर्मात्याचा दावा आहे की, जरी हा फोटो आपल्याला हलत असल्याचं दिसत असलं तरीही प्रत्यक्षात तो एक स्थिर फोटो आहे आहे. या फोटोची हालचाल जाणवणं म्हणजे डोळ्यांची फसवणूक आहे. ज्याची खास रचना ग्राफिक्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे. रंग आणि आकार यांच्या संयोगाने असे फोटो तयार केले जातात.