पाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 14, 2024, 04:31 PM IST
पाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा

Deepika-Ranveer Anniversary: बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्ना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक वर्षे दीपिका आणि रणवीर हे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 14 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केलं. नुकतेच रणवीरने त्याच्या सोशल मीडियावर लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच एक खास व्हिडीओ शेअर करत दीपिकाला  शुभेच्छा दिल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीर आई-बाबा झाले आहेत. अशातच दोघांनी मुलगी दुआचा फोटो शेअर केला होता. आज रणवीर आणि दीपिका त्यांच्या लग्नाचा 6 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 

रणवीर सिंगने शेअर केला खास व्हिडीओ

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंट केल्या आहेत. रणवीर सिंगने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका पदुकोणचे कधीही न पाहिलेले फोटो आहेत. त्यासोबत काही खास क्षण देखील आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडीओ शेअर करताना रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, प्रत्येक दिवस हा पत्नीची स्तुती करण्याचा दिवस असतो. पण आजचा दिवस खास आहे. #HappyAnniversary @deepikapadukone मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं रणवीरने म्हटलं आहे. 

रणवीर-दीपिका लग्न

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न खूपच खास पद्धतीने करण्यात आले होते. दोघांचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते. हे लग्न इटलीतील ग्रँड डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पार पडले होते. लग्नानंतर दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दीपिकाने दक्षिण भारतीय सिल्क साडी परिधान केली होती. तर रणवीर सिंगने पांढरी लुंगी आणि कुर्ता परिधान केला होता. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More