Optical Illusion : पक्ष्यांच्या फोटोत लपलाय पांडा, 15 सेकंदात शोधून दाखवा

'या' फोटोत पांडा तुम्हाला सापडला का? नसेल तर मित्रांना चॅलेंज द्या  

Updated: Nov 21, 2022, 09:22 PM IST
Optical Illusion : पक्ष्यांच्या फोटोत लपलाय पांडा, 15 सेकंदात शोधून दाखवा title=
Optical Illusion Panda hidden in bird photo find it in 15 seconds nz

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Panda hidden in bird photo find it in 15 seconds nz)

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रंजक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, जी तुमच्या मनाला नक्कीच धक्का देईल. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला सारखे दिसणारे अनेक पक्षी दिसतील. पण या पक्ष्यांमध्ये एक पांडाही कुठेतरी लपून बसला आहे. पण त्याला शोधण्यासाठी भल्याभल्यांना घाम फुटला आहे. आव्हान हे आहे की जर तुम्हाला 15 सेकंदात पांडा सापडला तर तुम्हाला प्रतिभाशाली म्हटले जाईल. मग पुढे जा आणि तो पांडा शोधा.

चित्र पाहा

तुम्ही बघू शकता की त्याने चित्रात सारख्या दिसणार्‍या पक्ष्यांचा गुच्छ सजवला आहे. त्यापैकी काही मजेशीर दिसत आहेत, तर काहींनी सनग्लासेस आणि बेसबॉल कॅप घातलेल्या आहेत. याशिवाय काही पक्षी कॉलर केलेल्या टी-शर्टमध्येही दिसतात. पण या पक्ष्यांमध्ये त्यांच्यासारखाच दिसणारा पांढरा पांडाही (Panda) गुपचूप बसला आहे. पण अट अशी आहे की तुम्हाला ते शोधून 15 सेकंदात सांगावे लागेल.

चित्रात लपलेला पांडा शोधा

तुम्हाला या चित्रात लपलेला पांडा शोधायचा आहे आणि हा पांडा शोधण्यासाठी तुमच्याजवळ फक्त 15 सेकंदाचा वेळ आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक या चित्राकडे पाहिल्यास तुम्हाला त्यात लपलेला  पांडा सापडेल. इतकं करुनही जर तुम्हाला  पांडा सापडत नसेल तर तुम्हाला आम्ही योग्य उत्तरासहीत एक फोटो खाली शेअर करतो. जेणेकरुन तुम्हाला त्या चित्रात लपलेला  पांडा पाहता येईल. 

 

तूम्ही पांडा पाहिलात का?

आम्हाला खात्री आहे की या चित्रात तुम्ही नक्कीच गोंधळून गेला असाल. कारण तो बनवणाऱ्या कलाकाराने पांडा अशा प्रकारे लपवला आहे की तो लोकांना सहजासहजी दिसत नाही. वास्तविक, पक्षी आणि पांडा यांच्यात फारसा फरक नाही. त्याच वेळी, रंगसंगती देखील जवळजवळ समान आहे. यामुळे लोकांना पांडा पाहता येत नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.