Optical Illusion Quiz: सोशल मीडियावर अनेकदा Optical Illusion चे फोटो व्हायरल होताना दिसतात. या फोटोंमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट शोधण्याचं टास्क देण्यात येतं. लोकांना देखील अशी कोडी सोडवण्यात फार मजा येते. आज आम्ही तुमच्यासाठी एक असंच Optical Illusion घेऊन आलो आहोत. या फोटोमध्येही तुम्हाला एक खास गोष्ट शोधायची आहे.
जेव्हा तुम्ही हा फोटो पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, एका रेस्टॉरंटमध्ये एक कपल कँडल लाइट डिनर करताना दिसतंय. या कपलच्या समोर असलेल्या टेबलवर पेस्ट्री, कॉफीचे 2 ग्लास आणि बऱ्याच गोष्टी आहेत. या जोडप्याच्या शेजारी एक वेटर बिल घेऊन उभा आहे. मुख्य म्हणजे हे बील भरण्यासाठी या मुलाला पर्स मिळत नाहीये. तर या फोटोमध्ये तुम्हाला या मुलाचं वॉलेट शोधायचं आहे.
या मुलाचं वॉटेल तुमच्या समोरच आहे. पण तुम्हाला ते दिसणं फार कठीण आहे. या फोटोमध्ये फार चलाखीने या मुलाचं वॉलेट लपवण्यात आलं आहे. जर तुम्हाला त्याचं वॉलेट नजरेला पडलं, तर नक्की तुमची नजर फार तेज आहे. जर तुम्हाला वॉलेट शोधता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो ते, कुठे आहे.
फार कमी लोकांना या फोटोमध्ये लपवलेलं वॉलेट सापडलं असेल. मात्र जर तुम्ही हा फोटो नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, मुलीच्या पाठी हे वॉलेट लपवण्यात आलं आहे. आता तुम्हाला नक्की या फोटोमध्ये हे वॉलेट दिसलं असेल.