नवी दिल्ली : पी चिदंबरम यांना अखेर सीबीआयने त्यांच्या जोरबागमधील घरातून अटक केली आहे. पी चिदंबरम मागील २७ तासापासून अटकेच्या समन्सनंतर गायब होते, यानंतर त्यांनी अकबररोडच्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपल्याला आणि आपल्या मुलाला फसवण्यात येत असल्याचं सांगितलं, तसेच आयएनएसक्स मीडियाचे आरोप आपल्यावर करण्यात आले ते बिनबुडाचे असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर ते आपल्या जोरबागच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या मागे पुन्हा सीबीआय आणि ईडीची टीम त्यांच्या अटकेसाठी पोहोचली आणि त्यांना जोरबागच्या घरी अटक करण्यात आली.
पी चिदंबरम यांच्यासोबत त्यांच्या घरी कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी हे उपस्थित होते. पी चिदंबरम हे देखील आपल्या घरी असल्याचं सांगण्यात येत होतं. (अपडेट रात्री ९ वाजून ४६ मिनिटांनी)
नवी दिल्ली : पी चिदंबरम यांच्या घरी सीबीआयची टीम अटक करण्यासाठी पोहोचली आहे. सीबीआय टीमसाठी पी चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे सीबीआय टीमला भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करावा लागला. सीबीआयने आपल्या मदतीसाठी दिल्ली पोलिसांची मदत घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी ईडीची टीम देखील दाखल झाली आहे. (अपडेट ९ रात्री)
अपडेट ८.४२ रात्री
नवी दिल्ली : पी चिदंबपम काँग्रेस मुख्यालयातून त्यांच्या घरी पोहोचले आहेत. काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते आपल्या घरी पोहोचले आहेत, आता सीबीआय टीम त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पी चिदंबरम यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व नेते देखील त्यांच्या घरी पोहोचले आहेत, आता सीबीआय यावर काय पावलं उचलणार आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (रात्री 8 वाजून ४२ मिनिटांचं अपडेट)
अपडेट ८.१५ रात्री
नवी दिल्ली : काँग्रेस नेते पी चिदंबरम अचानक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अवतरले आहेत. चिदंबरम यांच्यासाठी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे, यात चिदंबरम उपस्थित आहेत. काँग्रेसची ही पत्रकार परिषद दिल्लीत रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी सुरू झाली. पी चिदंबरम यांना अटकेचं समन्स आहे. २७ तासानंतर पी चिदंबरम समोर आले आहेत. माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, मला आणि माझा मुलगा कीर्ती यांना फसवण्यात आल्याचा आरोप चिदंबरम यांनी केलं आहे.
सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड, काँग्रेस मुख्यालयात पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काँग्रेस कार्यालयातील एका खोलीत बंद दरवाज्यात काँग्रेस नेते बसले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पी चिदंबरम हे काँग्रेस मुख्यालयातून बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे.
मी कायद्याचा सम्मान केला, तपास यंत्रणांनी देखील कायद्याचा सन्मान करावा, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. मी रात्रभर न्यायालयाचे पेपर्स तयार केले. काँग्रेस मुख्य़ालयात ही पत्रकार परिषद होती. काँग्रेस भवनाकडे सीबीआयची टीम रवाना झाली आहे.