रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं सॅनिटायझर

विद्यार्थ्याला आरोपींनी तीन पर्याय दिले होते

Updated: Oct 22, 2022, 05:22 PM IST
रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकलं सॅनिटायझर title=
प्रातिनिधिक छायाचित्र

गुजरातमधील (Gujarat) राजकोटमधून एक धक्कादायक रॅगिंगचे (ragging) प्रकरण समोर आले आहे. राजकोटमधील (Rajkot) एका खासगी विद्यापीठात 19 वर्षीय विद्यार्थ्याचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल (Blackmail) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पाच जणांनी पीडित विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यांनी विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर (sanitizer) आणि मध (honey) टाकला. एवढेच नाही तर यानंतर त्यांनी खासगी भागात टूथब्रश (toothbrush) आणि पेन्सिलही (pencil) टाकली. याशिवाय विद्यार्थ्याला त्याचा खासगी भाग कापून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. पाच आरोपींपैकी एक विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी पाचपैकी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असून त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 20 ऑक्टोबर रोजी, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी कुवाडवा रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मुलाने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितल्यानंतर ही तक्रार करण्यात आली.  पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी मुलाने त्याच्या मोठ्या बहिणीला मला हॉस्टेलमध्ये राहायचं नाही असं सांगितलं. तो बहिणीसोबत बोलताना ढसाढसा रडू लागला. तेव्हा त्याच्या बहिणीला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. बहिणीने तात्काळ वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली.

यानंतर वडील आणि बहीण दोघेही त्या मुलाला भेटायला आले. दोघांनाही पाहताच त्याला आणखीनच रडू कोसळले. त्यानंतर त्याने स्वतःसोबत घडलेली घटना सांगितली. गेल्या महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आंघोळ करताना त्याचा नग्न व्हिडिओ बनवला होता. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकीही त्यांनी दिली होती, असे विद्यार्थ्याने सांगितले.

पीडित विद्यार्थ्याने सांगितले की, आरोपींनी त्याला तीन पर्याय दिले होते. त्याने एकतर त्याचा खासगी भाग कापावा किंवा कान कापला नाहीतर हॉस्टलेच्या छतावरून उडी मार असे सांगितले. हे सर्व ऐकून विद्यार्थी घाबरला आणि विनवणी करू लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याला दुसरा पर्याय दिला की त्याने त्या लोकांना त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याचा मानसिक छळ करून अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. दरम्यान सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.