Covishield लसीसाठी पाकिस्तान भारताकडे मागतोय भीक

 पाकिस्तान भीकेचे कटोरे घेऊन भारताच्या दारात उभा

Updated: Jan 20, 2021, 04:41 PM IST
Covishield लसीसाठी पाकिस्तान भारताकडे मागतोय भीक title=

ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई : पाकिस्तान भीकेचे कटोरे घेऊन भारताच्या दारात उभा आहे. आम्हाला लस देता का लस.... असं पाकिस्तान भारताला सतत विचारतोय... पाकिस्तानला भारतात तयार झालेली कोविशिल्ड पाकिस्तानला हवीय.. पाकिस्तानला भारत लस देणार नाहीय. तरीही हपापलेल्या पाकिस्ताननं कोविशिल्डला मंजुरी दिलीय. भारत आणि पाकिस्तानचे तणावाचे संबंध पाहता पाकिस्तानला स्वप्नातसुद्धा भारत लस देणार नाही.

जीवनावश्यक बाब म्हणून पाकिस्तान कडून भारतीय उत्पादनाची मागणी होतेय. कोरोनावरील लस त्यांना हवी आहे. ती कुठल्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचते हे पाहावे लागेल. शिवाय यातून दोन देशांतील संबंधावर काय परिणाम होईल हे आज सांगता येणार नाही. 

काही जणांना मात्र कोरोना लस ही भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचं औषध वाटतंय. कोरोना मुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर चांगली गोष्ट आहे. मोदी सरकार ला विनंती आहे की ही संधी आहे तुम्ही स्वतःहून पाकिस्तान ला कोरोना लस देण्याची ऑफर द्यावी.पाकिस्तान याचा स्वीकार करेल की नाही हा वेगळा विषय आहे.पण यामुळे पाकिस्तानी जनतेत भारता बद्दल सोदार्य निर्माण होईल.

पाकिस्तानला भारत कधीच लस देणार नाही. मात्र WHO नं सगळ्या देशांसाठी लस मिळावी म्हणून कोवॅक्‍स योजना तायर केलीय. त्यामधून पाकिस्तानला कोविशिल्ड लस मिळण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे भूतान, मालदीव्हज, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्सला भारत लस निर्यात करणार आहे. पाकिस्तान दहशतवाद पोसतो, तिकडे काश्मीरमध्ये घुसखोरी करुन जवानांना ठार मारतो. असल्या पाकिस्तानला भारत लस देईल का ? भारतापुढे लसीसाठी हात पसरण्याआधी एकदा विचार तर करुन बघायचा.