'मुंबईला येऊन सगळ्यांना...', लॉरेन्स बिष्णोईचं नाव ऐकून पप्पू यादव संतापले, '24 तासांत टोळीचा...'

Pappu Yadav Statement on Lawrence Bishnoi : मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी चेतावनी दिली होती की, जर कायदा परवानगी देत ​​असेल तर 24 तासांत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा खात्मा करू, असं म्हटलं होतं. आता मी मुंबईत येतोय, सगळ्यांना....

नेहा चौधरी | Updated: Oct 21, 2024, 10:35 AM IST
'मुंबईला येऊन सगळ्यांना...', लॉरेन्स बिष्णोईचं नाव ऐकून पप्पू यादव संतापले, '24 तासांत टोळीचा...' title=
pappu yadav Coming to Mumbai on October 24 after warning to gangster lawrence bishnoi gang

Pappu Yadav Statement on Lawrence Bishnoi : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिहारचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला खुलं आव्हान दिलं होतं. पण नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लॉरेन्स बिष्णोईबद्दल विचारल्यावर पप्पू यादव हे संतापले. 'मला जे बोलायचं ते मी यापूर्वीच बोलो आहे, मी मुंबईला येतोय, सगळ्यांना औकांत दाखवले.'

पप्पू यादव यांना त्यांनी लॉरेन्स बिष्णोई यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हे ऐकताच ते वैतागले आणि म्हणाले की, हे सगळे फालतू प्रश्न इथे विचारू नका, असे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. आम्हाला जे काही बोलायचं होतं ते आम्ही ट्विटद्वारे सांगितलंय. आता जे काही बोलायचं आहे ते आम्ही मुंबईत बोलेल. 24 ऑक्टोबरला बोलणार आहेत. पप्पू यादवला शिकवू नका'

खासदार पप्पू यादव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'बघा, मी कोणत्याही ट्रोलरला प्रत्युत्तर देत नाही, होय मी त्यांचा पर्दाफाश करतो. बिहारमध्ये विषारी दारूमुळे शंभर लोकांचा मृत्यू झाला, 50 लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, मीडिया गप्प आहे. त्यामुळे मी गुन्हेगारांबद्दल बोलण्याऐवजी चर्चा करण्यासाठी मुंबईत येत आहे, मी सर्वांना सत्य सांगेन का? या पोस्टच्या माध्यमातून खासदार पप्पू यादव यांनी हावभावातून बरेच काही सांगितलंय. 

बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर खासदार पप्पू यादव यांनी त्यांची पोस्ट केली की, कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख, आता उद्योगपती आणि राजकारणी मारला गेला. कायद्याने परवानगी दिली तर मी 24 तासांत लॉरेन्स बिष्णोईचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करीन.' पण आता लॉरेन्सच्या प्रश्नावर पप्पू यादव फिरताना पाहून लोक सोशल मीडियावर कमेंट करून ट्रोल करत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x