पर्रिकर यांना होता पॅनक्रियाटिक कॅन्सर: जाणून घ्या काय आहेत याची लक्षणं

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. पर्रिकर यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता.

Updated: Mar 18, 2019, 01:32 PM IST
पर्रिकर यांना होता पॅनक्रियाटिक कॅन्सर: जाणून घ्या काय आहेत याची लक्षणं title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. पर्रिकर यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्याला स्वादुपिंडाचा कॅन्सर देखील म्हणतात. एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. पण पॅनक्रियाटिक कॅन्सर काय असतो याबाबत अनेकांना अजूनही माहित नाही. या कॅन्सरपासून लांब राहण्यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या.

पॅनक्रियाटिक कॅन्सर शरीराच्या स्वादुपिंडामध्ये होतो. मानवाच्या शरिरातील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्वादुपिंडात कॅन्सरच्या कोशिका तयार झाल्याने हा कॅन्सर होतो. हा कॅन्सर ६० पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त आढळून येतो. महिलांच्या तुलनेत तो पुरुषांमध्ये अधिक जाणवतो. हा कॅन्सर पोट आणि आतड्यांमध्ये होतो. हा कॅन्सर दुसऱ्या कॅन्सरच्या तुलनेत कमी होतो. पण सुरुवातीलाच त्याचं निदान न झाल्यास पुढे जाऊन तो जीवघेणा बनतो.

पॅनक्रियाटिक कॅन्सरची लक्षणं

- पॅनक्रियाटिक कॅन्सरमुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात. 
- पीडित व्यक्तीची त्वचा, डोळे आणि युरिन पिवळे होतात. 
- उलट्या, जीव घाबरणे असी लक्षण आढळतात.
- या कॅन्सरमुळे भूक कमी होत जाते.
- पॅनक्रियाटिक कॅन्सरमुळे व्यक्तीचं वजन कमी होत जातं.
- व्यक्ती कमजोर होत जातो. 

पॅनक्रियाटिक कॅन्सरची कारणं

- पॅनक्रियाटिक कॅन्सर रेड मीट आणि चर्बीयुक्त आहार अधिक प्रमाणात खाल्यामुळे होतो.
- शरीरात फॅट अधिक असल्यामुळे देखील हा आजार होतो.
- जर व्यक्तीला स्वादुपिंडामध्ये वेदना होत असतील तर त्यांने लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
- अधिक प्रमाणात धुम्रपान केल्याने देखील हा कॅन्सर होतो.
- हा कॅन्सर कधी कधी अनुवांशिक कारणाने देखील होतो.

या आजारापासून संरक्षण करण्यासाठी

- या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ताजी फळं आणि हिरव्या पालेभाज्या खाल्या पाहिजे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे लढण्यासाठी हे मदत करतात.
- या कॅन्सरपासून लांब राहण्यासाठी रेड मीट आणि चरबीयुक्त आहार नियंत्रणात खावे.  
- या आजारापासून लांब राहण्यासाठी ब्रोकली एक चांगला पर्याय आहे. ब्रोकलीमध्ये असलेले फायटोकेमिकल्समुळे अशा कॅन्सरपासून वाचण्यास मदत होते. ब्रोकली अँटी ऑक्सीडेंट म्हणून काम करतो.
-ग्रीन टी, लसून, सोयाबीन आणि अॅलोविरा यांचं सेवन केल्यास फायदा होतो.
- डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे या आजारात फार महत्त्वाचे असते. याकडे दुर्लक्ष करु नये.