नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने बालाकोट एयर स्ट्राइकबाबत मोठा खुलासा केला आहे. भारतीय वायुदलाने बालाकोट इथे केलेल्या हवाई हल्ल्यांना ऑपरेशन स्पाईस असं सांकेतिक नाव दिलं होतं असा खुलासा केला.
या हल्ल्यांमध्ये स्पाईस बॉम्बचा वापर करण्यात आल्याने या मोहिमेला मिशन स्पाईस असं नाव दिलं होतं असं वायुदलाने स्पष्ट केलं.
६०१ सिग्नल युनिटच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना बालाकोट एअर स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला परतवून लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याबाबत सन्मानित करण्यात येणार आहे.
२६ फेब्रुवारीला झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यानच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये वापरण्यात आलेल्या मिराज २००० च्या स्क्वाड्रन ९लाही सन्मानित करण्यात येणार आहे.
२७ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरच्या हवाई हद्दीत जात पाकिस्तानच्या एफ- १६वर निशाणा साधण्याची कामगिरी केल्याप्रकरणी भारतीय वायुदलाच्या सेवेत रुजू असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१व्या स्क्वाड्रनचा गौरव करण्यात करण्यात येणार आहे.