बाबा रामदेव यांचा भागीदार बनण्याची संधी, पंतजली शेअर बाजारात येणार

पंतजलीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

Updated: Dec 13, 2018, 02:09 PM IST
बाबा रामदेव यांचा भागीदार बनण्याची संधी, पंतजली शेअर बाजारात येणार title=

नवी दिल्ली : स्वामी रामदेव यांनी संकेत दिले आहेत की ते लवकरच पतंजली आयुर्वेद कंपनी शेअर बाजारात आणणार आहेत. म्हणजे लवकरच गुंतवणुकदारांना पंतजली कंपनीचा भाग होता येणार आहे. जेव्हा बाबा रामदेव यांना पंतजलीला शेअर बाजारात आणण्याविषयीचं मत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी याबाबत एका महिन्यात याबाबत चांगली बातमी मिळेल असं म्हटलं.

काही वर्षात मोठ यश

पतंजलीची सुरुवात एक आयुर्वेदिक औषधी कंपनी म्हणून झाली. काही वर्षातच कंपनीने मोठं यश मिळवलं. एफएमसीजी प्रोडक्टच्या क्षेत्रात कंपनी उतरल्यानंतर कंपनीचा नफा प्रचंड वाढला. कंपनीने पुढच्या 3 ते 5 वर्षात 20000 कोटींचा टर्नओव्हर करण्याचं लक्ष्य़ ठेवलं आहे. सध्या पंतजलीचा टर्नओवर जवळपास 10 हजार कोटींच्या घरात आहे. जीएसटी आणि डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कमध्ये काही बदल झाल्याने कंपनीची विक्री कमी झाली आहे.

बँकांना मदतीचं आवाहन

पीटीआयच्या बातमीनुसार, बाबा रामदेव यांना एका कार्यक्रमात पंतजली शेअर बाजारात कधी येणार याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत सकारात्मक उत्तर दिलं होतं. त्यामुळे लवकरच पंतजली शेअर बाजारात येणार आहे. यावेळी बाबा रामदेव यांनी असंही म्हटलं की, जर आवश्य सुविधा दिली गेली तर भारत उत्पादनाच्या क्षेत्राचं केंद्र बनू शकतो. अनेक क्षेत्र सध्या संकटात आहे. इमानदार उद्योगपतींना बँकांनी मदत केली पाहिजे. विजय माल्या सारख्या लोकांना नाही. असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x