गुवाहाटी : आसामचे आरोग्यमंत्री हिमांताबिस्व शर्मा यांनी आपल्या अजब तर्कट मांडत बुद्धीचे दर्शन घडवले आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, पूर्व आणि वास्तव जीवनात केलेल्या पापामुळे कॅन्सरसारख्या रोगाचा सामना करावा लागतो. या विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
हिमांताबिस्व शर्मा हे आपले अजब तर्कट मांडून इतक्यावरच थांबले नाहत. तर, त्यांनी पाप केल्यामुळे कॅन्सर होतो हे सांगतानाच हा दैवी न्याय आहे, असेही म्हटले आहे. एका आयोजिक कार्यमात बोलताना शर्मा यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले, जेव्हा आपण पाप करतो तेव्हा इश्वर आपल्याला शिक्षा देतो. अनेकदा बातमी येते की एकाद्या तरूणाला कॅन्सर झाला. हा व्यक्ती तरूणपणाच गेला. जर आपण या सर्व गोष्टींच्या कारणांच्या मुळापर्यंत गेलो तर, दैवी न्यायामुळेच हे घडल्याचे आपल्याला दिसेल, असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले.
विशेष म्हणजे हेमंत बिस्व शर्मा यांनी ज्या कार्यक्रमात ही मुक्ताफळे उधळली तो कार्यक्रम, शिक्षकांना नेमणूक पत्र देण्यासाठी आयोजिक करण्यात आला होता. या वेळी बोलतान मंत्री मोहदय म्हणाले, 'गरजेचे नाही की एखादी चूक आपणच करायला हवी. अनेकदा आपल्या आई-वडीलांच्या चुकीमुळेही असे होऊ शकते. चूक करणारा कोणीही दैवी न्यायापासून वाचू शकत नाही.त्याला आपल्या चुकीबद्धल शिक्षा ही मिळते. गीता आणि बायबलमध्येही याचा उल्लेख असल्या'चेही शर्मा यांनी बिनदिक्कतपणे सांगितले.
आरोग्यमंत्र्यांच्या या विधानामुळे ते चौफेर टीकेचे लक्ष ठरले आहेत. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस नेते देवव्रत सैकिया यांनी म्हटले आहे की, आरोग्यमंत्र्यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. कॅन्सरसारख्या घातक रोगाचा सामना करणाऱ्या रूग्णांच्या भावना दुखावण्यातला हा प्रकार आहे. या विधानाबद्धल मंत्र्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.