बाजारात स्वस्त सोने खरेदीची संधी सोडू नका; या तारखेला सबस्क्रिप्शन सुरू

 आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत आहे. 

Updated: Oct 22, 2021, 08:42 AM IST
बाजारात स्वस्त सोने खरेदीची संधी सोडू नका; या तारखेला सबस्क्रिप्शन सुरू

मुंबई : आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत आहे. अर्थमंत्रालयाने गुरूवारी म्हटले की, सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम सबस्क्रिप्शनसाठी पाच दिवस सुरू राहणार आहे. 

सरकारने 2021-22 सिरिजसाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign gold bond)ऑक्टोबर 2021 - मार्च 2022 च्या दरम्यान, चार टप्प्यांमध्ये जारी करण्यात येईल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण मिळून 10 टप्प्यांमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड लॉंच करण्यात येणार आहे. या स्किमअंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बॉंड लॉंच केले गेले आहे. 

25 ऑक्टोबरपासून सुरू होणार सब्सस्क्रिप्शन
अर्थ मंत्रालयाने म्हटले की, 2021-2022 सिरिजचा सातव्या टप्प्याचे सब्सस्क्रिप्शन 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. सॉवरेन बॉंड 2 नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे.

येथे करा गुंतवणूक
अर्थ मंत्रालयने म्हटले की, हा बॉंड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (NSE आणि BSE)च्या माध्यमातून विकले जाणार आहे.

सॉवरेन गोल्ड बॉंडचा अवधी 8 वर्षांचा असणार आहे. आणि पाचव्या वर्षानंतर ग्राहकांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये तुम्ही किमान गुंतवणूक 1 ग्रॅम इतकी असणार आहे.