पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात आजही वाढ

पेट्रोल-डिझेल महागलं

Updated: Jan 22, 2019, 10:40 AM IST
पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात आजही वाढ title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात आजही वाढ पाहायला मिळाली. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 13 पैशांनी तर चेन्नईमध्ये 14 पैशांनी वाढवला आहे. तर डिझेलमध्ये देखील दिल्ली आणि कोलकातामध्ये 19 पैसे तर मुंबईमध्ये 20 पैसे आणि चेन्नईमध्ये 21 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये मंगळवारी पेट्रोलचे दर क्रमश: 71.27 रुपये, 73.36 रुपये, 76.90 रुपये आणि 73.99 रुपये प्रति लीटर झाले. तर डिझेल क्रमश: 65.90 रुपये, 67.68 रुपये, 69.01 रुपये आणि 69.62 रुपये प्रति लीटर झालं आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाले आहेत. पण ब्रेंट क्रूडचा भाव आजही डॉलरच्या वर सुरु आहे. आणि डब्ल्यूटीआय देखील 53 डॉलर प्रति बॅरलच्या वर सुरु आहे. कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, चीनमध्ये मंदी आल्याने वैश्विक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत.