Petrol-Diesel price : येत्या 15 दिवसात दर कितीने वाढणार?

Petrol and Diesel Rate Hike : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर महागाईचा फटका देखील सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. 

Updated: Mar 22, 2022, 04:31 PM IST
Petrol-Diesel price : येत्या 15 दिवसात दर कितीने वाढणार? title=

Petrol, diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज अखेर 4 महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी 76 ते 86 पैशांची वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 76 ते 84 पैशांची वाढ झाली आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात अनुक्रमे 15 ते 22 रुपयांची वाढ होऊ शकते. (Petrol and Diesel rate increase in next 15 days)

गेले 4 महिने स्थिर असलेले दर आज वाढले आहेत. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे (Domestic gas cylinder) दर ही 50 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे येत्या काळात सगळ्याच गोष्टी महागण्य़ाच्या शक्यता आहेत. पेट्रोल आणि डिझेल आणखी 15 ते 22 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर नोव्हेंबर 2021 पासून वाढलेले नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा दिला होता. पाच राज्यातील निवडणुकानंतर दर वाढतील अशी शक्यता वर्तवली गेली होती. 10 मार्चला निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या 4 महिन्यात कच्चा तेलाचे दर (Crude oil prices) वाढून देखील भारतात दर स्थिर होते.

पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात वाढ होण्यामागचं कारण, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे (Ukraine-Russia war, कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ आहे. पेट्रोल-डिझेल हे अनुक्रमे 15 ते 22 रुपयांनी महाग होऊ शकतं. 12 रुपयांची वाढ आणि तेल कंपन्यांचं कमिशन असं पकडून 15 रुपयांची वाढ यामुळे येत्या काळात अपेक्षित आहे. पण तेल कंपन्या एकत्र इतकी मोठी वाढ करणार नाही. त्यामुळे टप्प्या-टप्प्यात ही वाढ होऊ शकते. 

येत्या काळात कच्च्या तेलाचे दर 185 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते. यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर महागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 117 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. 

रशिया-यूक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरु असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 40 टक्के वाढले आहेत. कच्च्या तेलाचे दर 14 वर्षाच्या सर्वात उच्च स्तरावर पोहोचले आहे. 2008 मध्ये 139 डॉलर प्रति बॅरल पर्यंत कच्चा तेलाचे दर पोहोचले होते. याचा प्रभाव जगावर पाहायला मिळाला होता.

शहर पेट्रोल (रुपये/लीटर)  डिझेल (रुपये/लीटर)

दिल्ली    96.21                       87.47

मुंबई      110.82    95.00

कोलकाता 105.51 90.62

चेन्नई 102.16 92.19

पटना 105.90 91.09

भोपाल        107.23 90.87

जयपुर 107.06 90.70

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, भारताच्या शेजारील देशांवर नजर टाकली तर काही दिवसांपूर्वी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेत (sri lanka) पेट्रोल 254 रुपयांवर पोहोचले होते. याशिवाय पाकिस्तानमध्ये (Pakistan) पेट्रोल १५९ रुपये, तर बांगलादेशमध्ये (Bangladesh) १०८ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी काही काळ सुरु राहिले तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 185 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर कच्च्‍या तेलाची किंमत एक डॉलरने वाढली तर देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 50 ते 60 पैशांनी वाढते. अशा स्थितीत उत्पादन घटल्याने आणि पुरवठ्यात व्यत्यय आल्याने त्याची किंमत निश्चितच वाढणार असून, कच्च्या तेलाने प्रति बॅरल $१५० ओलांडल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १५ ते २२ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असून 85 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची खरेदी बाहेरून करतो. आयात होत असलेल्या कच्च्या तेलाची किंमत भारताला अमेरिकन डॉलरमध्ये मोजावी लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो, म्हणजेच इंधन महाग होऊ लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर साहजिकच भारताचे आयात बिल वाढेल. भारताचे आयात बिल 600 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

महागाई वाढण्याचा धोका

देशात महागाई (rising inflation) वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्यात आणखी वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनीही अलीकडेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. कच्चे तेल महाग झाल्यास त्याचा फटका देशातील पेट्रोल-डिझेल आणि गॅसवर पडणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतुकीवर होणारा खर्च वाढेल आणि भाज्या, फळांसह दैनंदिन वस्तू ही महागणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होतो.