Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात खिशाला झळ? एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल?

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल  कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या खिशाला दिलासा मिळाला की झळ बसली? जाणून घ्या आजचे दर... 

Updated: Mar 14, 2023, 08:32 AM IST
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात खिशाला झळ? एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल?  title=
Petrol Diesel Price On 14 March 2023

Petrol Diesel Price On 14 March 2023 : जर तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाणून घ्या..गेल्या काही दिवसापासून  कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. आजही कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price on 14 march 2023) किमती स्थिर आहेत.  

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार आज दिल्लीत (delhi petrol rate) पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर भारताची आर्थिक राजधानी मुंबईत (mumbai petrol rate) पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आणि 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर होते.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये 
  • मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर 
  • बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 101.96 रुपये आणि डिझेलचा दर 87.91 रुपये
  • कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.71 रुपये
  • चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.19 रुपये 
  • विझागमध्ये पेट्रोल 110.45 रुपये आणि डिझेल 98.27 रुपये 
  • पाटण्यात एक लिटर पेट्रोलचा दर 107.35 रुपये तर डिझेलचा दर 94.05 रुपये 
  • सुरतमध्ये एक लिटर पेट्रोल 96.31 रुपये, तर डिझेल 92.06 रुपये
  • गुडगावमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 97.20 रुपये आणि डिझेलची किंमत 90.07 रुपये
  • चंदीगडमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.19 रुपये आणि डिझेलची किंमत 84.26 रुपये

Petrol Diesel चे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App मोबाईलवर डाऊनलोड करुन तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) SMS द्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.