पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 10, 2024, 10:00 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?  title=

Petrol Diesel Price Today in Mahararashtra : काही राज्यांतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही राज्यांतील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. कारण काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे रविवारी सकाळपासूनच राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवर आहे. कारण राज्यातील पेट्रोल पंप चालक रविवार 10 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास संपावर जाणार आहेत.  

राजस्थान पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 48 तासांसाठी “नो खरेदी, नो सेल” अशी घोषणा केली आहे, असे राजस्थान पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे खजिनदार संदीप बगेरिया यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या इंधन दरांवरून सरकारला लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भाजप सरकार पेट्रोलचे दर कमी करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, मात्र काहीही झाले नाही. आमच्या व्यापारी संघटनेतील 33% डीलर्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 97.25 वर 

WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 98.99 पर्यंत वाढली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 97.25 वर पोहोचला आहे. तेलाच्या किंमती अशी असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये आज पेट्रोल पंपचालकांचा संप आहे. राज्यात आज आणि सोमवार दोन्ही पेट्रोल पंप बंद असणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 86.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल  92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर तर डिझेल  94.24 रुपये प्रति लिटर
  • बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये प्रति लिटर तर डिझेल   87.89 रुपये प्रति लिटर
  • पाटणा पेट्रोल107.24 रुपये प्रति लिटर तर डिझेल  94.04 रुपये प्रति लिटर
  • गुरुग्राम पेट्रोल 97.18 रुपये प्रति लिटर तर डिझेल  90.05 रुपये प्रति लिटर
  • केरळ पेट्रोल 117.17 रुपये प्रति लिटर तर डिझेल  103.93 रुपये प्रति लिटर
  • जयपूर पेट्रोल 108.73 रुपये प्रति लिटर तर डिझेल  95.03 रुपये प्रति लिटर
  • लखनौ पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर तर डिझेल  89.76 रुपये प्रति लिटर
  • तिरुवनंतपुरम पेट्रोल 108.58 रुपये प्रति लिटर तर डिझेल  97.45 रुपये प्रति लिटर
  • पोर्ट ब्लेअर पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल  79.74 रुपये प्रति लिटर
  • गुरुग्राम पेट्रोल 97.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल  89.96 रुपये प्रति लिटर
  • चंदीगड पेट्रोल 98.65 रुपये प्रति लिटर तर डिझेल  88.95 रुपये प्रति लिटर
  • हैदराबाद पेट्रोल 109.66 रुपये प्रति लिटर तर डिझेल  97.82 रुपये प्रति लिटर