Mukesh Ambani: देशातील सर्वात वॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये मुंबईत होईल. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानींचे लग्नही थाटामाटात पार पाडले. ईशाचे सासरे अजम पिरामल देशाचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. आकाशचे सासरे अरुण रसेल मेहता यांचा ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. तर अनंत अंबानींचे होणारे सासरे एक मोठी फार्मा कंपनी चालवतात. पण मुकेश अंबानींच्या या तीन व्याहींमध्ये सर्वात श्रीमंत कोण, माहितीय का? याबद्दल जाणून घेऊया.
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबीनीचे लग्न श्लोका मेहतासोबत झाले. श्लोकाचे वडील अरुण रसेल मेहता हे देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक आहेत. रसेल मेहता हे डायमंड ज्वेलरीतील मोठा ब्रांड रॉसी ब्लूचे एमडी आहेत. या कंपनीचा व्यवसाय 12 देशांमध्ये पसरलाय. त्यांची एकूण संपत्ती 3 हजार कोटीच्या आसपास आहे. देशातील 26 शहरांमध्ये या कंपनीचे 36 हून अधिक स्टोअर्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अरुण रसेल मेहतांचे नेटवर्थ साधारण 3000 कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चंटसोबत जुलैमध्ये होणार आहे. नुकतेच जामनगरमध्ये झालेल्या प्रीवेडींगमध्ये सोहळ्यासाठी जगभरातील बड्या दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले होते.राधिकाचे वडील विरेन मर्चेंट फार्मा कंपनी एनकोर हेल्थकेयरचे सीईओ आहेत. तसेच ते दुसख्या एका कंपनीत डायरेक्टर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे नेटवर्थ 755 कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानींच्या व्याहींमध्ये अजय पिरामल सर्वात श्रीमंत मानले जातात. अंबानींची एकुलती एक लेक ईशा अंबानींचे लग्न पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाले. बिझनेस फार्मापासून हेल्थ, फायनान्स सेक्टरमध्ये त्यांचा व्यवसाय पसरलाय. या ग्रुपचा व्यवसाय 30 हून अधिक देशांमध्ये पसरलाय. फॉर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार अजय पिरामल यांचे नेटवर्थ 2.8 अरब डॉलर म्हणजेच 2,31,70 कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानी भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या श्रीमंतांच्या यादीत येतात. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्री भारतातील सर्वात मोठी वॅल्युएबल कंपनी आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 113 अरब डॉल आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत अकराव्या स्थानी आहेत. या वर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये 16.8 अरब डॉलरची वाढ झाली. अंबानी परिवाराची रिलायन्समध्ये 42 टक्के भागीदारी आहे. रिलायन्स ग्रुपचा व्यवसाय पेट्रोकेमिकलपासून रिटेल,टेलिकॉम आणि ग्रीन एनर्जीपर्यंत पसरलाय.