Good News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा

 PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate) 

Updated: Aug 31, 2022, 11:14 AM IST
Good News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा title=

मुंबई : PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate) जर तुम्ही लहान बचत योजना PPF, सुकन्या समृद्धी योजना, NPS किंवा किसान विकास पत्र इत्यादींमध्ये देखील गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सप्टेंबरच्या तिमाहीत SSY आणि PPF च्या व्याजदरात बदल करण्याची तयारी करत आहे. त्याचा थेट फायदा अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे.

रेपो दरात 1.40 टक्के वाढ

विक्रमी पातळीवर चालू असलेली महागाई, व्याजदरात वाढ झाल्याने बँकांच्या व्याजदरात पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने केलेले बदल 1 ऑक्टोबरपासून लागू केले जाणार आहेत. तीन वेळा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

बचत योजनांवरील व्याजदरात वाढ अपेक्षित

अल्पबचत योजनेवरील व्याजदरांचे 30 सप्टेंबर रोजी पुनरावलोकन केले जाणार आहे. हा आढावा ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीसाठी घेतला जाणार आहे. यावेळी सरकारकडून बचत योजनांवरील व्याजदरात वाढ अपेक्षित आहे. अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही.

व्याजदर का बदलणार?

बँका आणि आरबीआय दोन्ही सरकारच्या लहान बचत योजनांवर व्याज वाढवण्याच्या बाजूने आहेत. RBI ने मे पासून रेपो दरात तीनदा वाढ केली आहे आणि सध्या तो 5.4 टक्क्यांवर चालू आहे. येत्या काळात त्यात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु सरकारने बचत योजनांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. अशा परिस्थितीत पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील परतावाही वाढण्याची शक्यता आहे.

व्याजदर दर तिमाहीत सुधारित होतात

लहान बचत योजनांवरील व्याजाचे सरकार दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते. या पुनरावलोकनादरम्यान, व्याजदर वाढवायचे अथवा कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो. हे व्याजदर अर्थ मंत्रालय ठरवतात.

जाणून घ्या कोणत्या बचतीवर किती व्याज 

सध्या PPF वर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. त्याच वेळी, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.6 टक्के वार्षिक परतावा दिला जातो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट खात्याबद्दल बोललो, तर त्याचा परतावा 5.8 टक्के आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के आहे.