PF Wthdraw: पीएफ अकाऊंटमधून पैसे काढायचेयत? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

How to withdraw money from PF: तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढू शकता. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 16, 2024, 01:46 PM IST
PF Wthdraw: पीएफ अकाऊंटमधून पैसे काढायचेयत? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप title=
पीएफ

How to withdraw money from PF:  भविष्य निर्वाह निधी  पीएफचे पैसे निवृत्ती निधी आणि पेन्शनसाठी जमा केले जातात. यासाठी नोकरदार वर्गाच्या पगारातून विशिष्ट रक्कम जमा केली जाते. रिटायर्टमेंट प्लानिंग म्हणून हा निधी आपल्याला उपयोगी येतो. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची वेगळी तरतूद नसते. त्यामुळे त्यांना पीएफ अकाऊंटवर अवलंबून राहावे लागते. असे असले तरी आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. मग तेव्हा पीएफचे जमा असलेले पैसे आठवतात. पण हे पैसे काढता येतात का? किती रक्कम आपण काढू शकतो? यासाठी काय करावं लागतं? याबद्दल अनेकांना माहिती नसते.

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढू शकता. पण कोणत्या परिस्थिती हे पैसे काढता येतात? हे माहिती करुन घेऊया. सर्वसाधारणपणे तुम्ही 2 महिने किंवा त्याहून अधिक काळ बेरोजगार असाल तरच संपूर्ण ईपीएफ रक्कम निवृत्तीपूर्वी काढता येते.

कोणत्या परिस्थितीत आंशिक पैसे काढता येतात?

वैद्यकीय गरज, स्वतःचे किंवा मुलाचे लग्न,गृहकर्ज फेडण्यासाठी,घर खरेदी करण्यासाठी,घराचे नूतनीकरण करण्यासाठी या परिस्थितीत आंशिक पैसे काढू शकता. यासाठी ईपीएफओ ​​सदस्य किमान 5 किंवा 7 वर्षांसाठी EPF सदस्य असणे आवश्यक आहे.

पीएफमधून आंशिक पैसे काढण्याची प्रक्रिया

तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करुन घ्या. सर्वप्रथम UAN पोर्टलवर जा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका. आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येईल. यानंतर ओटीपी आणि कॅप्चा टाका. तुमचे प्रोफाइल पेज उघडेल. वेबपेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला "ऑनलाइन सेवा" हा पर्याय दिसेल. आता स्क्रोल डाउन ऑप्शन्समधून 'क्लेम' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ईपीएफओशी लिंक केलेले बँक खाते, क्रमांक टाकून मेंबरशिप तपशीलांची पडताळणी करा.आता दावा केलेली रक्कम EPFO ​​द्वारे या बँक खात्यात जमा केली जाईल असे सांगणारे एक प्रमाणपत्र येईल. आता नियम आणि अटींवर 'होय' वर क्लिक करा.आता तुम्ही ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, एक विभाग उघडेल ज्यामध्ये तुम्हाला अधिक तपशील भरावे लागतील. आता तुमचा पत्ता द्यावा भरा आणि स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म 15G सारखे काही दस्तऐवज अपलोड करा. आता ईपीएफ खात्यातील शिल्लक काढण्यासाठी दावा सादर केला जाऊ शकतो.

पीएफ खात्यातील शिल्लक कशी जाणून घ्यायची?

आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती आपल्याला असायला हवी. कारण गरजेच्या वेळेला ही रक्कम तुम्हाला उपयोगी येईल. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या EPF खात्यातील शिल्लक आणि तुमच्या खात्यातील अपडेटेड कॉन्ट्रीब्युशन देखील जाणून घेऊ शकता. तुम्हाला नोंदणीकृत क्रमांकावरून AN EPFOHO ENG टाइप करून मेसेज पाठवावा लागेल. इथे ENG चा संदर्भ इंग्रजी आहे. तुम्हाला दुसऱ्या भाषेत जाणून घ्यायचे असल्यास त्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाईप करा.