Taj Mahal Controversy : जगप्रसिद्ध असणारे ताज महलातील 22 खोल्या उघडण्यावरुन वाद निर्माण झाला होता.या 22 खोल्यांमध्ये नेमकं काय दडलंय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने पहिल्यांदाच या खोलीतील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, ASIने सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवर शेअर केले आहेत.
ASIकडून 22 खोल्यांचे फोटो शेअर -
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने 22 खोलींचे फोटो शेअर केले आहे. खोल्यांची डागडुजी केल्यानंतर हे फोटो काढल्याची माहिती समोर आली आहे. प्लास्टर करण्यासाठी खोल्या उघडण्यात आले असल्याचे समजते आहे. जवळपास 6 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
ताजमहलच्या 22 खोल्या उघडण्याची याचिका -
ताजमहालमधील 22 खोल्या उघडण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. आरटीआय (RTI) अर्जाद्वारे याचिकाकर्त्यांने खोल्या उघडून चौकशी करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात डॉ. रजनीश सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.
कोण आहेत डॉ.रजनीश सिंह?
डॉ.रजनीश सिंह हे अयोध्येतील रहिवासी आहेत.तसेच डॉ.सिंह हे भाजपचे कार्यकर्ते आहे. नेमकं ताजमहलाच्या 22 खोल्यामंध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी याचिका केली होती.
याचिकेवर कोर्टाचा काय निर्णय?
अलाहाबाद कोर्टाने डॉ.रजनीश सिंह यांच्या याचिकेला फेटाळून लावले.तसेच याचिका न्यायालयीन मुद्द्यांवर आधारित नसल्याचे याचिकाकर्त्याला सुनावले. याचिकेवर सुनावणी करणे अशक्य आहे. या प्रकरणी शोध समिती स्थापना करु शकत नाही, असंही यावेळी म्हटलंय.