Upcoming IPO | शेअर बाजारातून छप्परफाड कमाईची संधी; या आठवड्यात 3 IPO येणार

Upcoming IPO List |  Paradeep Phosphatesचा IPO या आठवड्यात प्रथम 17 मे रोजी उघडेल. यानंतर 18 मे रोजी Ethos IPO आणि 20 मे रोजी eMudhra IPO येईल. तिन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित IPO मधून सुमारे 2,387 कोटी रुपये उभारणार आहेत.

Updated: May 16, 2022, 07:35 PM IST
Upcoming IPO | शेअर बाजारातून छप्परफाड कमाईची संधी; या आठवड्यात 3 IPO येणार title=

मुंबई : Upcoming IPO This Week:शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा चांगलाच व्यस्त ठरणार आहे. एकीकडे देशातील सर्वात मोठा IPO आणणारी सरकारी विमा कंपनी LIC चे शेअर्स खुल्या बाजारात लिस्ट होणार आहेत. दुसरीकडे, या आठवड्यात तीन नवीन IPO देखील उघडणार आहेत. हे IPO गुंतवणूकदारांना शेअर बाजारात येण्याची चांगली संधीही देऊ शकतात.

शेअर बाजार BSE वर उपलब्ध माहितीनुसार, Paradeep Phosphates चा पहिला IPO या आठवड्यात 17 मे रोजी खुला होणार आहे. यानंतर 18 मे रोजी Ethos IPO आणि 20 मे रोजी eMudhra IPO येईल. 

तिन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित IPO मधून सुमारे 2,387 कोटी रुपये उभारणार आहेत. Paradeep Phosphates च्या IPO चा आकार सर्वाधिक 2,387 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे, Ethos IPOचा आकार 472 कोटी रुपये आहे आणि eMudhra IPO आयपीओचा आकार 412 कोटी रुपये आहे.

Paradeep Phosphatesमध्ये सरकारचा वाटा

Paradeep Phosphates या खत कंपनीत केंद्र सरकारचीही 19.55 टक्के भागीदारी आहे. हा IPO 19 मे पर्यंत खुला असणार आहे आणि त्यासाठी 39-42 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

ऑफर फॉर सेलमध्ये, सरकार 11,24,89,000 इक्विटी शेअर्स विकणार आहे, तर Zuari Maroc Phosphates प्रायव्हेट लिमिटेड 60,18,493 शेअर्स विकणार आहे. सध्या Zuari Maroc Phosphates Pvt Ltd कडे पारादीप फॉस्फेट्समध्ये 80.45 टक्के हिस्सा आहे.

 किंमत, बँड आणि तारखा

देशातील सर्वात मोठी लक्झरी घड्याळ विक्रेता कंपनी Ethos चा IPO 20 मे पर्यंत खुला असेल. यासाठी 836-878 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

eMudhra च्या IPO ची किंमत 243-256 रुपये आहे आणि ती 24 मे रोजी बंद होईल. IPO मध्ये रु. 161 कोटींचा नवीन इश्यू आणि रु. 251.79 कोटींच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.