'फिजिक्सवाला' अडकतोय विवाहबंधनात, जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी; Networth ऐकून झोप उडेल

PhysicsWallah Wedding: ऑनलाइन फिजिक्स इंस्ट्रक्टर आणि PhysicsWallah चे संस्थापक आणि सीईओही अलख पांडे (Alakh Pandey) विवाहबंधनात अडकणार आहेत. करोडोंचे मालक असणारे अलख पांडे यांची होणारी पत्नी कोण आहे याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.   

Updated: Feb 22, 2023, 10:08 PM IST
'फिजिक्सवाला' अडकतोय विवाहबंधनात, जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी; Networth ऐकून झोप उडेल title=

PhysicsWallah Wedding: अलख पांडे (Alakh Pandey) हे नाव भारतात चांगलंच प्रसिद्ध आहे. अलख पांडे हे ऑनलाइन फिजिक्स इंस्ट्रक्टर असून PhysicsWallah चे संस्थापक आणि सीईओही आहेत. अलख पांडे हे आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. दरम्यान सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे अलख पांडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अलख पांडे आपली प्रेयसी शिवानी दुबेशी (Shivani Dubey) लग्नगाठ बांधणार आहेत. 

कोण आहे शिवानी दुबे?
अलख पांडे आणि शिवानी दुबे यांचे प्रेमसंबंध होते. दोघांचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. शिवानी दुबे ही पत्रकार आहे. दोघांचंही याच महिन्यात दिल्लीमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न होणार आहे. 

अलख पांडे यांच्याप्रमाणे शिवानीही प्रयागराजची रहिवासी आहे. शिवानी दुबे मनोरंजन, राजकारण आणि सामाजिक विषयांवर पत्रकारिता करते. तिला लिहिण्याची आवड आहे. तिने अनेक वृत्तसंस्थांमध्ये काम केलं असून यामध्ये I-D, Refinery29, Elle, Vice यांच्यासह अनेक मॅगझिन्स आहेत. 

दरम्यान अलख पांडे यांच्याबद्दल बोलायचं गेल्यास त्यांनी तिसऱ्या वर्षातच कॉलेज सोडलं होतं. यानंतर त्यांनी फिजिक्स शिकवण्यास सुरुवात केली होती. स्वस्तामध्ये शिक्षण देण्याच्या इच्छेखातर त्यांनी YouTube चॅनेलची स्थापना केली  होती. लवकरच त्यांनी PhysicsWallah ची स्थापना केली. ही कंपनी JEE आणि NEET अर्जदारांच्या पसंतीच्या शीर्षस्थानी आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचं प्रशिक्षण देते. 

2017 मध्ये कंपनी भारतातील युनिकॉर्नच्या यादीत सामील झाली. त्यांनी PhysicsWallah स्टार्टअपला 8,500 कोटींचं मूल्य असणारी कंपनी बनवली आहे. अलख पांडे हे भारतातील प्रसिद्ध आणि आवडीच्या शिक्षकांपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्यांचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला अलख पांडे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.  यावेळी त्यानी राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या अनेक पैलूंवर आणि राज्यातील शिक्षणपद्दती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांवर चर्चा केली. तसंच उत्तर प्रदेशात कोचिंग सेंटर सुरू करण्याबाबतही भाष्य केलं.