नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. सरकार पंतप्रधान आणि किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते. मीडिया रिपोर्ट नुसार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांच्या ऐवजी 12 हजार रुपये मिळतील. म्हणजेच शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 हजाराच्या ऐवजी 4000 रुपये मिळतील.
PM Kisan मध्ये आता मिळतील 4000 रुपये
मीडिया रिपोर्टनुसर बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अर्थ मंत्री निर्मला सितारमण यांच्याशी बातचीत केली. कृषीमंत्र्यांच्या मते, PM Kisan निधीची रक्कम दुप्पट होऊ शकते. त्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. खरे पाहता मंत्र्यांनी हा फक्त दावा केला आहे. केंद्र सरकारकडून असे कोणतेही सूचक विधान किंवा दावा करण्यात आलेला नाही.
19500 कोटी रुपये ट्रान्सफर
केंद्र सरकारने गेल्या सोमवारी देशभरातील 9.75 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 19500 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, PM Kisan सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. त्याच्या या विधानावरूनही सन्मान निधी वाढवल्या जाण्याचा कयास लावला जात आहे.