PM Kisan | 'या' शेतकऱ्यांना परत करावे लागतील पीएम किसान योजनेचे पैसे; जाणून घ्या कारण

pm kisan latest news : पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने अवैधरित्या या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला हप्त्याचे पैसे परत करावे लागतील

Updated: Jan 12, 2022, 12:04 PM IST
PM Kisan | 'या' शेतकऱ्यांना परत करावे लागतील पीएम किसान योजनेचे पैसे; जाणून घ्या कारण title=

मुंबई : पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. जर एखाद्या लाभार्थ्याने अवैधरित्या या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील बनावट लाभार्थ्यांबाबत सरकार आता कठोर कारवाई करीत आहे.

पीएम किसान योनजेअंतर्गत बनावट शेतकऱ्यांकडून पैसे पुन्हा परत घेतले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 7 लाख बनावट शेतकऱ्यांनी 10 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये  पती पत्नी, मृत शेतकऱी इत्यादींच्या नावे फसवणूक करून योजनेचा फायदा घेण्यात आला आहे. 

योजनेअंतर्गत ज्या अपात्र आणि बनावट शेतकऱ्यांनी हफ्त्यांचा लाभ घेतला आहे. त्यांची ओळख पटवून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

स्वतः केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. की अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.