पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे गुगल मॅपवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या चीन आणि म्यानमार दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. 

Updated: Sep 3, 2017, 08:32 PM IST
पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे गुगल मॅपवर title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या चीन आणि म्यानमार दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्यादरम्यान ते ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. 

खरंतर, २०१४ मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी दुसऱ्या देशांसोबतचे संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांचे सतत परदेश दौरे सुरु असतात.

पंतप्रधान मोदींच्या परदेशी दौऱ्याला काही प्रमाणात यश आले असले तरी विरोधक मात्र त्यांच्यावर यावरुन जोरदार टीका करतात. पंतप्रधान देशात कमी आणि परदेशात जास्त असतात अशी टीका नेहमीच विरोधकांकडून होतेय.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींनी कोणत्या देशांचे दौरे कधी केलेत याची संपूर्ण माहिती तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. 

गुगल मॅपच्या सहाय्याने गेल्या तीन वर्षात पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते.