गांधीनगर : गुजरातमधील (Gujarat) मच्छू नदीवरील मोरबी पुल (Macchu River Bridge Collapse) कोसळल्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांनी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. या घटनेत आतापर्यंत ताज्या आकडेवारीनुसार 135 जणांचा मृत्यू झालाय. स्वत: पंतप्रधानांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. मोदींनी काही वेळ घटनास्थळी पाहणी केली. तसेच मोदींनी बचावकार्याचाही आढावा घेतला. (pm narendra modi approaches incident site in morbi gujarat search and rescue operation is underway in machchhu river)
सोमवारी रात्री मोदींच्या नेतृत्वात या दुर्घटनेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. मोदी मोरबीचा दौरा करुन जखमींची भेट घेणार असल्याची माहिती या बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.
#MorbiBridgeCollapse | Prime Minister Narendra Modi approaches the incident site in Morbi, Gujarat, while the search and rescue operation is underway in the Machchhu river.
Death toll in the incident stands at 135 so far. pic.twitter.com/apg6x7L8uT
— ANI (@ANI) November 1, 2022
गुजरातमधील मोरबी येथील हा पूल 765 फूट लांब आणि 4 फूट रुंद होता. हा पूल 143 वर्षे जुना होता. या पुलाचे 1879 मध्ये उद्घाटन करण्यात आलं होतं. मोरबीचा हा केबल ब्रिज राजा वाघजी रावजी यांनी बांधला होता. राजा रावजी यांनी 1922 पर्यंत मोरबीवर राज्य केलं. दरबारगड राजवाडा हा नजरबाग पॅलेसला जोडता यावा या उद्देशाने वाघजी यांनी हा पूलाचं बाधंकाम केल्याचं म्हटलं जातं.