Knowledge News: गॅस सिलेंडरलाही असते Expiry Date! असं कराल चेक

महानगरातील अनेक घरांमध्ये पाइपलाइनच्या मदतीने घरगुती गॅस पुरवठा केला जातो. असं असलं तरी देशातील जवळपास सर्वच भागात एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. हा सिलेंडर काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं असतं. कारण एखादी चूक महागात पडू शकते. त्यामुळे सिलेंडर घरी येण्यापूर्वी त्याचा वॉल आणि एक्सपायरी डेट चेक करणं महत्त्वाचं आहे. 

Updated: Nov 1, 2022, 05:11 PM IST
Knowledge News: गॅस सिलेंडरलाही असते Expiry Date! असं कराल चेक title=

LPG Gas Cylinder Expiry Date: महानगरातील अनेक घरांमध्ये पाइपलाइनच्या मदतीने घरगुती गॅस पुरवठा केला जातो. असं असलं तरी देशातील जवळपास सर्वच भागात एलपीजी सिलेंडरचा (LPG Cylinder) वापर केला जातो. हा सिलेंडर काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं असतं. कारण एखादी चूक महागात पडू शकते. त्यामुळे सिलेंडर घरी येण्यापूर्वी त्याचा वॉल आणि एक्सपायरी डेट चेक करणं महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पण खरंच एलपीजी सिलेंडरला एक्सपायरी डेट असते का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तर 'हो' असं आहे. चला तर जाणून घेऊयात

सिलेंडर एक्सपायर झाल्यानंतर त्यात असलेला गॅस दबाव सहन करू शकत नाही. त्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस सिलेंडरवर लिहिलेली एक्सपायरी डेट तपासणं महत्त्वाचं ठरतं. पण अनेकदा याबाबतची माहिती ग्राहकांना नसते. गॅस सिलेंडरवर असलेल्या तीन पट्ट्यांवर A-23, B-24 किंवा C-25 असे नंबर लिहिलेलं असतं. हे नंबरच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या एक्सपायरी डेटबाबत सांगतात. 

अशा प्रकारे ओळखा एक्स्पायरी महिना 

  • जर तुमच्या सिलेंडरवर A लिहिलेले असेल तर ते अल्फाबेट जानेवारी ते मार्च महिना दर्शवते.
  • जर तुमच्या सिलेंडरवर B लिहिले असेल तर ते अल्फाबेट एप्रिल ते जून महिना दर्शवत आहे.
  • त्याचप्रमाणे तुमच्या सिलेंडरवरील C हे अल्फाबेट जुलै ते सप्टेंबर महिना दाखवते.
  • तुमच्या सिलेंडरवर D लिहिलेले अल्फाबेट ऑक्टोबर ते डिसेंबर महिना दर्शवते.

Knowledge News: रेल्वे स्थानकावर टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल लिहिलेलं वाचलंय का? काय असतो फरक जाणून घ्या

आता अल्फाबेटच्या पुढे लिहिलेला आकडा घरगुती गॅस सिलेंडरचं वर्ष सांगतं. उदाहरणार्थ, D-23 म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर आणि वर्ष 2023. त्यामुळे तीन महिन्यानंतर सिलेंडर एक्सपायर होणार आहे असा त्याचा अर्थ होतो.