बिहार निवडणूक : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

 एनडीएवर लोकांना विश्वास असल्याचे पंतप्रधान  म्हणाले. 

Updated: Nov 1, 2020, 11:30 AM IST
बिहार निवडणूक : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल  title=

छपरा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ९४ विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रॅली करतायत. यातील पहीली रॅली चपरासीमध्ये झाली. रॅलीमध्ये पंतप्रधानांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आणि एनडीएवर लोकांना विश्वास असल्याचे ते म्हणाले. 

नीतीश बाबूंच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा बनतेय हे पहील्या टप्प्यातील मतदानातून हे स्पष्ट झालंय. ज्यांनी मतदान केलंय त्यांचे मी अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले. बिहारच्या लोकांची भावना हे समजू शकत नाही. ते आपल्या परिवारात जन्मास आले आणि परिवारातच भांडत आहेत. 

एनडीएसाठी तुमचे प्रेम काहींना आवडत नाही. त्यांना रात्री झोप येत नाही. ते निराश आहेत, रागवलेयत. त्यांच्या चेहऱ्यावरच हसू गेलंय. आता बिहारची जनता हे सर्व पाहतेय. 

जगभरातील सर्व देशांना कोरोनाचा फटका बसलाय. यामध्ये सर्वांचेच नुकसान झालंय. एनडीए सरकारने कोरोनासाठी प्रयत्न केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संकटकाळात एनडीए देशातील गरीब जनतेच्या बाजूने उभी राहील्याचे पंतप्रधान म्हणाले.