राजकारण्यांसहित कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा

अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. 

Updated: May 12, 2019, 02:48 PM IST
राजकारण्यांसहित कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा  title=

नवी दिल्ली : सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मतदान केलं. नवी दिल्लीतल्या औरंगजेब लेन इथल्या सीनिअर सेकंडरी स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी यांचं घर असलेल्या तुघलक रोड उथून मतदान केंद्रावर ते चालत पोहोचले. मतदान केंद्र त्यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर दूर आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या अजय माकन यांची लढत भाजपा उमेदवार मीनाक्षी लेखी यांच्याशी होतेय.

 लोकशाहीमध्ये जनताच मालक असते, जनता जो कौल देईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत आपलं मतदान केलं. सोनिया यांनी दिल्लीच्या निर्माण भवन इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. त्यांच्यासोबत यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या देखील उपस्थित होत्या. 

लोकशाहीच्या उत्सवात समाजसेवक नंदकिशोर गोयंका यांनीही सहभाग घेतला. गोयंका यांनी हिसारमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. देशातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी गोयंका यांनी केलंय. यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलं. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलं. ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, राजपूर रोड, सिव्हिल लाईन्स इथं त्यांनी मतदान केलं. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील नवी दिल्लीतल्या औरंगजेब लेन इथल्या सीनिअर सेकंडरी स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 

आधी लग्न लोकशाहीचं असं म्हणत दोन नववधू लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्या. राजगढ लोकसभा क्षेत्रातील गुदरावण गावातील या नववधूंनी लग्नाची तयारी सोडून आधी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्र क्रमांक १८३ वर या दोघींनी मतदान केलं. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावलाय. गुरुग्राम इथल्या मतदान केंद्रावर कोहली पोहचला. सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी असल्याने बराच वेळ कोहली रांगेत उभा होता. यावेळी कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्याशी संवाद साधला. à¤µà¤¿à¤°à¤¾à¤Ÿ कोहली ने गुड़गांव में किया मतदान, भोपाल में प्रज्ञा ठाकुर पहुंचीं वोट डालने

यानंतर कोहलीने आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येकानं मतदान करून कर्तव्य बजावलं पाहिजे पाहिजं असं आवाहन कोहलीने मतदानानंतर केलंय. भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा चुनाव के छठे चरण में इन सीटों पर होगी कांटे की टक्कर, ये दिग्गज हैं मैदान में

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याशी लढत आहे. मतदानाआधी प्रज्ञासिंह यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर भोपाळमधील मतदान केंद्रावर जाऊन साध्वींनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रावर वाद 

उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर मतदान केंद्रावर भाजपा उमेदवार मेनका गांधी यांचा वाद झाला. महाआघाडीचे उमेदवार सोनू सिंह यांच्याशी त्यांचा वाद रंगला. ही दबंगगिरी चालणार नाही अशा शब्दांत मेनका गांधी यांनी सोनू सिंह यांना ठणकावल्याचं पाहायला मिळालं. सोनू सिंह आणि त्याचे साथीदार मतदारांना धमकावत असल्याचा आरोप मेनका गांधी यांनी केलाय.