यामुळे झाला हत्तीणीचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील प्राथमिक कारण

केरळमधील हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

Updated: Jun 4, 2020, 05:24 PM IST
यामुळे झाला हत्तीणीचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील प्राथमिक कारण title=

केरळ : केरळमधील मल्लपुरममध्ये हत्तीणीच्या मृत्यूनंतर देशभरात शोक आणि संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, मल्लपुरममध्ये हत्तीणीच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. दरम्यान, हत्तीणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आहे.

पोस्टमॉर्टम अहवालानुसार, पाण्यात असल्यामुळे हत्तीणीच्या शरीरात भरपूर पाणी गेले होते. ज्यामुळे फुफ्फुसांचं कार्य बंद झाले होते. हथिनीच्या मृत्यूचं हे प्राथमिक कारण समोर आले आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की, ओरल कॅविटीमध्ये जखमांमुळे सेप्सिस झाला. तोंडात स्फोट झाल्यामुळे हे घडले आहे. यामुळे तिला खूप वेदना झाल्या. ज्यामुळे तिला दोन आठवडे अन्न आणि पाणी घेता आले नाही. अन्न आणि पाणी घेण्यास सक्षम नसल्यामुळे हत्तीणी कमजोर झाली. ज्यामुळे मग पाण्यात बुडून हत्तीणीचा मृत्यू झाला.

मानवतेला काळीमा फासणारी ही घटना मल्लपुरममधून समोर आली आहे. गर्भवती असलेल्या हत्तीणीला अननसमध्ये फटाके टाकून खायला देण्यात आले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, स्फोटात हत्तीणीचे दातही तुटले होते.