सर्वसामान्यांना 'झटका' लागणार, वीजेचे दर वाढण्याची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना झटका लागण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 21, 2018, 09:26 PM IST
सर्वसामान्यांना 'झटका' लागणार, वीजेचे दर वाढण्याची शक्यता  title=

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना झटका लागण्याची शक्यता आहे. वीज कंपन्या त्यांचे दर वाढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्जाचा बोजा वाढल्यामुळे वीज उत्पादक कंपन्यांनी सरकारकडून मदत मागितली आहे. सरकारी आणि खासगी वीज उत्पादक कंपन्यांनी कोळशावर असलेल्या जुन्या प्लांट्सना अपग्रेड करण्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी ही मदत मागितली आहे. वीज उत्पादक कंपन्यांना प्रदूषण कमी करण्यासाठी जुन्या प्लांट्सना अपग्रेड करावं लागणार आहे.

हे प्लांट्स अपग्रेड केल्यावर वीज उत्पादन खर्चही वाढणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या या कंपन्या वीजेची मागणी वाढल्यावर आणखी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे वीजेचे दर ९३ पैसे प्रती युनिट वाढू शकतात.