नीरव मोदीनंतर आणखी एक ज्वेलरने लावला १४ बँकांना चुना, १००० कोटी घेऊन फरार

  पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४.  १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे. 

Updated: Mar 21, 2018, 08:17 PM IST
नीरव मोदीनंतर आणखी एक ज्वेलरने लावला १४ बँकांना चुना, १००० कोटी घेऊन फरार title=

नवी दिल्ली :  पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४.  १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे. 

मॉरिशनमध्ये आहे कनिष्क गोल्डचे प्रमोर्टर्स 

कनिष्क गोल्डचे रजिस्टर्ड ऑफिस तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. याचे प्रमोटर्स आणि डायरेक्टर भूपेश कुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन आहे. बँकर्सचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  बँकांच्या माहितीनुसार हे दोघे सध्या मॉरिशसमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणात सीबीआयने अजूनही एफआयआर दाखल केलेली नाही. 

SBI समवेत १४ बँकांचे कर्ज 

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार कनिष्क गोल्डला कर्ज देणाऱ्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियासह खासगी आणि सरकारी १४ बँकांचा समावेश आहे. २५ जानेवारीला सीबीआयने लिहिलेल्या लेटरमध्ये एसबीआयने आरोप लावला होता, की कनिष्क गोल्ड रेकॉर्ड बदलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि रात्रीतून दुकान बंद करत आहेत. एकूण ८२४ कोटी रुपयांच्या व्याजाचा विचार केला तर ही रक्कम १००० कोटीच्या घरात जाते.  

 

कोणत्या बँकेचे किती कर्ज 

स्टेट बँक ऑफ इंडिया: 215 कोटी 
आईसीआईसीआई बँक: 115 कोटी 
यूनियन बँक ऑफ इंडिया: 50 कोटी 
सिडिकेट बँक: 50 कोटी 
बँक ऑफ इंडिया: 45 कोटी 
IDBI बँक: 45 कोटी 
यूको बँक: 40 कोटी 
तमिलनाड मर्केंटाइल बँक: 37 कोटी 
आंध्रा बँक: 30 कोटी 
बँक ऑफ बड़ौदा: 30 कोटी 
HDFC बँक: 25 कोटी 
सेंट्रल बँक: 20 कोटी 
कॉरपोरेशन बँक: 20 कोटी