मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे : प्रकाश आंबेडकर

राज सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

Updated: Jun 17, 2021, 06:04 PM IST
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे : प्रकाश आंबेडकर title=

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावे. अशी प्रतिक्रिया  बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी दिली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता. तसेच ते कोल्हापुरात मुक आंदोलनात सहभागी देखील झाले होते. 

मराठा आरक्षण

राज सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. जे जे लोक आरक्षणाच्या भूमिकेला पाठींबा देणारे असतील त्यांना सोबत घ्यावे. आम्ही ही सोबत असू. असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 

काँग्रेससोबत युती?

नाना पटोले वंचित ला सोबत घेण्याबद्दल बोलत आहेत. पण हे त्यांच्या दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का ? आम्हाला महाराष्ट्रातील नेत्यांचा अनुभव चांगला नाही. अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

राम मंदिर जमीन घोटाळा

'राम मंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी. त्याच सोबत यापूर्वी देखील लोकांनी ज्या सोने चांदी याच्या मूर्ती दिल्या होत्या त्याच काय झाल याची ही चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. शिवसेनेने जमिनी सोबत पूर्वीच्या देणग्यांचे काय झाले हे ही विचारावे. '