प्रियंका गांधी-वाड्रांनी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा वृत्ताचा केला इन्कार

प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी होण्याचे शक्यता असल्याचे वृत्त त्यांच्या कार्यालयाने फेटाळले आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2017, 03:58 PM IST
प्रियंका गांधी-वाड्रांनी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा वृत्ताचा केला इन्कार title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी होण्याचे शक्यता असल्याचे वृत्त त्यांच्या कार्यालयाने फेटाळले आहे. त्याचवेळी भविष्यात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात, या चर्चेलाही काही अर्थ नाही, असेही त्यांच्या कार्यलयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षातील जबाबदारीचे पद प्रियंका गांधी यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र त्यांना कोणतेही महत्त्वाचं पद देण्यात येणार नाही आणि यावर काहीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती प्रियका गांधी यांचे स्वीय सचिव पी. सहाय यांनी माहिती देताना म्हटलेय.

काँग्रेसला नवी संजवणी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी यांना कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष बनू शकतात असे वृत्त 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले. दिल्लीत नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने 'डीएनए' हे वृत्त दिले होते.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वर्किंग कमिटीच्या बैठकिच्या शेवटी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काही ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचं वृत्तामध्ये म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव  मांडला असता याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याची माहिती सूत्रांची होती.