कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपूटंनी दंड थोपटले आहेत.   

Updated: Apr 24, 2023, 02:07 PM IST
कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार  title=

Indian Wrestler : भारतीय कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ (Wrestling Federation of India) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia), विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि साक्षी मलिक (Sakshi Malilk) यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे (Sexual Abuse) गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पुन्हा एकदा दिल्लीतल्या जंतर-मंतरवर (jantar mantar) धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा भारतीय कुस्तीपटूंनी दिला आहे. 

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सात महिला कुस्तीपटूंनी तक्रार दाखल केली आहे. पण तक्रारीनंतरही त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. पण या समितीने काय चौकशी केली आणि त्यातून कोणता निष्कर्ष काढण्यात आला हे समोर आलंच नसल्याचंही कुस्टीपटूंनी म्हटलंय. 

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, हे प्रकरण गंभीर असूनही यावर कारवाई केली जात नाहीए, अंस विनेश फोगाटने म्हटलं आहे. अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार मनात आले होते. बृजभूषण शरण सिंह चार वेळा खासदार राहिले आहेत. ते शक्तिशाली आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार केली की आम्हाला जिवे मारण्याची धमकी मिळते असंही विनेश फोगाटने म्हटलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांना वाचवण्यासाठी कोण साथ देत आहे? असा सवाल भारतीय कुस्तीपटूंनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जंतर-मंतरवरुन हलणार नाही असा इशारा कुस्तीपटूंनी दिलाय. 

आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही जनतेसमोर आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विनंती केली आहे असं कुस्तीपटू साक्षी मलिकने म्हटलं आहे. भारतीय कुस्ती सुरक्षित हातात जावी असं आम्हाला वाटतं, त्यासाठीच आमचा लढा सुरु आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आम्हालाच खोटं सिद्ध करु नका अशी विनंतही साक्षी मलिकने केली आहे. समितीचा अहवाल महासंघाकडे सादर करण्यात आला आहे. त्या अहवालात काय आहे हे जाहीर करावं, अशी मागणी भारतीय कुस्तीपटूंनी केलीय. 

महिला आयोगलाची दिल्ली पोलिसांना नोटीस
या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, पण अद्याप दिल्ली पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

ब्रिज भूषण सिंह यांच्यावरचे आरोप
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी अपशब्दांचा वापर केला तसंच खेळाडूंना शिव्याही दिल्याचा आरोप आहे. काही खेळाडू आणि राज्याला टार्गेट केलं जात आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचाही आरोप आहे.