पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. 

Updated: Aug 26, 2017, 09:07 AM IST
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद  title=

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. 

पुलवामा जिल्हा पोलीस लाईनमध्ये पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात एक पोलीस शहीद, तर दोन पोलीस आणि सीआरपीएफचे तीन जवान जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात काहीकाळ चकमक सुरु होती.

दरम्यान, सुरक्षारक्षकांनी संपुर्ण परिसराची नाकाबंदी केली असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.