मुंबई : नीरव मोदी प्रकरणामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची जगभरात चर्चा झाली. दरम्यान अजून एका घोटाळ्यामुळे बॅंक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महत्त्वाचा डेटा लीक झाल्याचा घोळ या बॅंकेतून समोर आलायं.
१० हजार क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरील माहिती 'डार्क वेब' वर उघड झाली असून विकण्यासाठी उपलब्ध आहे.
'ब्लूमबर्गक्विंट'ने यासंदर्भातील वृत्त दिलेय. बंगळुरच्या क्लाउडसेक इन्फो सिक्युरिटीच्या हवाल्याने त्यांनी हे वृत्त दिलेय.
दरम्यान या लीक झालेल्या व्यवहारांचा उपयोग करुन फसवणुक झालीए का ? याचा शोध घेतला जातोय.
बॅंकेच्या ग्राहकांची नावे, कार्डवरील एक्सपायरी डेट, पर्सनल आयडी नंबर आणि सीसीव्ही सारखी महत्त्वाची माहिती लीक झालीए.
ही माहिती कोणी लीक केली यासंदर्भात काही कळू शकले नाही.ही सर्व माहिती 'डार्क वेब' वर ५ डॉलर म्हणजेच ३२५ रुपयांना उपलब्ध आहे.
गेल्या २ महिन्यांपासून हे काम सुरु आ. १ नोव्हेंबरला पहिल्यांदा डेटा अपलोड करण्यात आला. २८ जानेवारीला शेवटची माहिती अपलोड करण्यात आल्याचेही समोर आले आहे.