नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांचं नाव यंदाच्या संभाव्य 'नोबेल' पुरस्काराच्या यादीमध्ये आहे.
सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीत होणार आहे. ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स'ने काही संभाव्य नावांची यादी जाहीर केली आहे.
रघुराम राजन यांनी आरबीआयचे गर्व्हनरपद तीन वर्षांसाठी सांभाळले. ४ सप्टेंबर २०१६ साली ते या पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये परतले. गर्व्हनर पदावरून निवृत्त झाल्यानंतर रघुराम राजन यांनी वर्षभरात "कॉमेट्री अॅन्ड स्पीचेस"हे पुस्तक लिहले.
नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतीय सरकारने काळ्या पैशाविरोधात कडक पाऊलं उचलताना नोटाबंदीचा निर्णय घेतला. यावरही रघुराम राजन यांनी आपली परखड मतं मांडली होती. २००८ साली हाऊसिंग बाजार व्यवस्था कोसळली त्याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याची भविष्यवाणी रघुराम राजन यांनी केली होती.
२०११ साली 'फॉल्ड लाईन्स' यामधून अर्थव्यवस्थेतील छुप्या गोष्टी जगाच्या अर्थव्यवस्थेला कशा मारक ठरत आहेत हेदेखील ठळकपणे सांगितले होते.