Railway Recruitment: तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण आहात? चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड म्हणजेच आरआरबी अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II च्या रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या विविध पदांच्या एकूण 9144 जागा भरल्या जातील.टेक्निशियन ग्रेड 1 आणि टेक्निशियन ग्रेड 2 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच यासोबत आयटीआय उत्तीर्णही असावे. उमेदवाराने एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे.
टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची माहिती कळवण्यात येईल. सर्वप्रथम कॉम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागेल. CBT1 परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागले. उमेदवाराला त्यानंतर CBT2 परिक्षा द्यावी लागेल. CBT2 परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पडेल. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यावेळी तुम्ही भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेली कागदपत्रे तपासली जातील. खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांची संभाव्य नोकरी मिळण्यााधीच जाऊ शकते. यानंतर उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. या सर्व टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे.
टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षांदरम्यान असावे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. टेक्निशियन ग्रेड 2 पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे इतके असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
खुल्या गटातील उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. तर एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्ल्यूईडी आणि महिला उमेदवारांकडून 250 रुपये इतके शुल्क घेतले जाईल, याची नोंद घ्या.
8 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. तसेच अर्जामध्ये खरी माहिती भरा.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More
LIVE|
SCO
182/5(20 ov)
|
VS |
WI
18/1(2.3 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
NED
(19.5 ov) 147
|
VS |
PAK
148/7(19.3 ov)
|
| Pakistan beat Netherlands by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.