मेलबर्न : ऑस्ट्रेलियात धगधगलेल्या आगीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या भयंकर आगीच्या झळा जगभरातल्या प्रत्येक नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. या आगीमध्ये अनेक माणसांनी त्याचप्रमाणे प्राणी आणि पक्ष्यांनी आपले प्राण गमावले आहे. ही आग आटोक्यात येण्यासाठी प्रत्येकाने देवाकडे प्रर्थना केली. अखेर देवाने ती प्रार्थना ऐकली आहे. अखेर ऑस्ट्रेलियात वरूण राजा बरसला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
A gathering on Glastonbury Tor to pray for Australia. Praying and hoping for rain over the coming days. A heart made of people was formed. #PrayForAustralia #AustraliaOnFire #glastonburytor pic.twitter.com/E4bkMF8JCF
— Michelle (@Glastomichelle) January 5, 2020
पावसाचं आगमन झाल्यानंतर प्रचंड खूश झालेल्या ऑस्ट्रेलियन बांधवांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांना झालेला आनंद सर्व काही सांगून जात नाही. भडकलेल्या आगीने आतापर्यंत तब्बल २३ जणांचा बळी घेतला आहे. तर ५० कोटी प्राणी आणि पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले.
Una bona notícia enmig de tanta cendra mundial!
Plou a Austràliapic.twitter.com/wXBr7eXhTJ— Txell (@txellsota) January 5, 2020
या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी ३ हजार रिझर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले. तर आता पावसामूळे आग आटोक्यात येत आहे. या पावसांच्या सरींमध्ये नाचून कांगारूंनी पावसाचं स्वागत केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर तेथील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्टच्या संशोधनानुसार या आगीत ४८ कोटी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आगीचे पडसाद संपूर्ण जगात पसरले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार २०१७ च्या आधीपासून ऑस्ट्रेलिया दुष्काळाचा सामना करत आहे.