बिटकॉईन घोटाळा : राज कुंद्राची ईडीकडून चौकशी सुरू

बिझनेसमन असलेला राज कुंद्रा ईडी कार्यालयासमोर हजर झालाय आणि त्याची चौकशी सुरू आहे.

Updated: Jun 5, 2018, 01:11 PM IST
बिटकॉईन घोटाळा : राज कुंद्राची ईडीकडून चौकशी सुरू  title=

मुंबई : बिटकॉईन प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलेत. ईडी कार्यालयात राज कुंद्राची चौकशी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राला बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. बिझनेसमन असलेला राज कुंद्रा ईडी कार्यालयासमोर हजर झालाय आणि त्याची चौकशी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित भारद्वाजनं राज कुंद्राचं नाव उघड केल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. बिटकॉईनद्वारे पैसे कमावणाऱ्या बडी धेंडांचं पितळ यामुळे उघडं पडेल, असं दिसतंय. हा घोटाळा तब्बल दोन हजार करोड रुपयांचा असल्याचं समजतंय.