भाजप पराभवाच्या छायेत ! वसुंधरा राजे सरकारच्या या '5' चुका भाजपाला भोवल्या

राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असूनही अजमेरमध्ये भाजपाला पराभवाचा सामाना करावा लागत आहे.

Updated: Feb 1, 2018, 12:59 PM IST
भाजप पराभवाच्या छायेत ! वसुंधरा राजे सरकारच्या या '5' चुका भाजपाला भोवल्या  title=

अजमेर  : राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असूनही अजमेरमध्ये भाजपाला पराभवाचा सामाना करावा लागत आहे. अजमेर लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली.  भाजपाचे स्वरूप लांबा आणि रघू शर्मा यांच्यामध्ये संघर्ष होता. मात्र भाजप पराभवाच्या छायेत आहे .  

चुकीचा उमेदवार - भाजपाचे स्वरूप लांबा हे चुकीचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक लोकांवर त्यांची फार चांगली छाप नाही.  

राजपुतांचा रघू शर्मांना पाठिंबा - या जागेसाठी राजपूत  समाजाची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. वसुंधरा राजेंच्या सरकारच्या काही निर्णय, भूमिकांवर राजपूत समाजाची नाराजी असल्याने त्यांनी भाजपाऐवजी कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. 

आनंदपाल सिंहच्या समर्थकांची कॉंग्रेसला पाठिंबा - आनंदपाल सिंह या गॅंगस्टरची एका एनकाऊंटरमध्ये हत्या झाली. त्यानंतर अजमेरमधील लोकांमध्ये नारजी होती. परिणामी त्यांच्या समर्थकांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला.  

सचिन पायलटने 'जाट' मतं जोडली - 2014 साली सचिन पाललट अजमेरमध्ये हरले तरीही त्यांनी जाट मतं जोडली होती. त्याचा फायदा यावेळेस कॉंग्रेसला झाला.  

पद्मावत मुळे नाराजी - राजपूतांनी  'पद्मावत'ला विरोध केला होता. अजमेरच्या पारंपारिक मतदात्यांनी पाठ फिरवल्याने भाजपाला फटका बसला. वसुंधरा राजेंनी 'पद्मावत'ला पाठिंबा दिला होता.