नवी दिल्ली : नोटबंदीवर यशवंत सिन्हांनी मोदी सरकारवर केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकबाबत पत्रकारांनी विचारणा केली, तेव्हा राजनाथ सिंह आणि रवीशंकर प्रसाद या मंत्र्यांची बोलती बंद झाली.
यशवंत सिन्हांच्या टीकेला उत्तर कोणी द्यायचं यावरून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं. अखेर राजनाथ सिंग यांनी याला उत्तर दिलं. भारत ही जगातली सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, हे कोणीही विसरू नये, असं राजनाथ सिंग म्हणाले.
सध्या देशात आर्थिक मंदी प्रमाणे स्थिती निर्माण झालेय. त्यामुळे जीडीपीत घसरण पाहायला मिळत आहे. असे असताना नोट बंदीने अधिक भर पडल्याची जोरदार टीका सिन्हा यांनी केली.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे आर्थिक घडी बिघडण्यास मदत झालेय. जीडीपीच्या घसरणीत नोटाबंदीने अधिक भर घातलाय, अशी टीका केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रातील लेखात करण्यात आलेय. सिन्हा यांनी यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाची अर्थव्यवस्था खाली आणली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर मी गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असे म्हणत त्यांनी जेटलींवरच थेट तोफ डागली. पक्षाविरोधात बोलण्याचे धाडस करत नाहीत, असे लोक माझ्या बोलण्याने दुखावले जातील, हे मला ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीचा निर्णय खूपच चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. लाखोंनी आपल्या नोकऱ्या गमवाव्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होत आहे. जीडीपी ५.७ टक्क्यांवर आला. गेल्या तीन वर्षांतील निचांकी नोंदवली. पण नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जाते, हे चुकीचे आहे असे ते म्हणालेत.